महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nandurbar Bus Accident : चालकाचे नियंत्रण सुटताच बस पलटली; 15 प्रवासी जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक

नंदुरबार जिल्ह्यात असलेल्या शहादा शहरात एका बसचा भीषण अपघात झाला आहे. बसमधील १५ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

bus accident In nandurbar
चालकाचे नियंत्रण सुटताच बस पलटली

By

Published : Apr 12, 2023, 11:40 AM IST

Updated : Apr 12, 2023, 12:21 PM IST

चालकाचे नियंत्रण सुटताच बस पलटली; 15 प्रवासी जखमी

नंदुरबार : गुजरात राज्यातील सुरत येथून मध्यप्रदेशाकडे जाणाऱ्या सुरत खरगोन बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला आहे. अपघातात बस पलटी होऊन 15 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर शहादा शहरातील खासगी आणि सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. पहाटे तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर पोलीस प्रशासन यांनी मदतीसाठी धाव घेतली. पलटी झालेल्या बसमधून प्रवाशांना वाचवण्यात आले. या ठिकाणी वारंवार अपघात घडत असून प्रशासनाच्या वतीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.


मध्यप्रदेश राज्यात जाणाऱ्या बसचा पहाटे अपघात : गुजरात राज्यातील सुरत येथून मध्यप्रदेशाकडे जाणाऱ्या सुरत खरगोन बसचा नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरानजिक 132 केवी सब स्टेशन जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला आहे. अपघातात बस पलटी होऊन 15 प्रवासी जखमी झाले, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. पहाटे तीन वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. पहाटेच्या सुमारास चालकाला डुलकी लागल्याने बस डिव्हायडरवर जाऊन धडकली आणि बस पलटी झाली.


मोठाअनर्थ टळला :सुरत खरगोन बसला झालेल्या अपघातात मोठा अनर्थ टळला आहे. बस डिव्हायडरला न धडकता सब स्टेशनला धडकली असती तर मोठा अपघात झाला असता. शहादा शहराला वीज पुरवठा करणाऱ्या 132 केवीचे सबस्टेशन नजीकच आहे. परिसरातील नागरिकांनी मदत केली. पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडलेल्या बसच्या अपघाताने मोठा आवाज झाला. यात परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत बसमधील जखमींना बाहेर काढण्यास मदत कार्य सुरू केले. 108 रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर या ठिकाणी वारंवार अपघात घडत असून प्रशासनाच्या वतीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

हेही वाचा: Thane Accident भिवंडीतील दोन वेगवेगळ्या भीषण अपघातात बाप लेकासह चार जणांचा मृत्यू

Last Updated : Apr 12, 2023, 12:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details