महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांचा मोर्चा

सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी संघटनेच्यावतीने नवापूर तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि विविध प्रश्नांच्या उत्तरांकरिता भव्य मोर्चा काढण्यात आला.

सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांचा मोर्चा

By

Published : Sep 9, 2019, 8:34 PM IST

नंदुरबार - सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी संघटनेच्यावतीने नवापूर तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि विविध प्रश्नांच्या निरसनाकरिता सोमवारी भव्य मोर्चा काढण्यात आला होता.

सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांचा मोर्चा


सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी संघटनेच्यावतीने नवापूर तहसील कार्यालयावर नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्न भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात हजारो आदिवासी शेतकरी सहभागी झाले होते. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्यात यावे. त्यासोबत नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनदावे प्रश्न प्रलंबित असून ते लवकर सोडविण्यात यावे. तसेच ग्रामीण भागातील रोजगार हमी योजनांची कामे लवकरात-लवकर सुरू करावीत. स्थलांतरित मजुरांना रेशन उपलब्ध करून द्यावे, इत्यादी मागण्यांसाठी नवापूर तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details