महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सारंगखेडा चेतक उत्सव लोकसहभागातून होणार साजरा - Sarang kheda Chetak Festival canceled

चेतक उत्सव जागतिक पातळीवर घेऊन जाण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाने पुढाकार घेतला. त्यानुसार पर्यटन विभागाने 'ललुजी आणि सन्स' या कंपनीसोबत करार केला होता. मात्र, हा करार वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर सरकारने चेतक उत्सवाला काही दिवस बाकी असतानाच रद्द केले. मात्र, आयोजकांनी या वर्षी लोकसहभागातून चेतक उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

nandurbar
चेतक उत्सव

By

Published : Dec 9, 2019, 12:05 PM IST

नंदुरबार- दत्त जयंतीपासून सुरू होणाऱ्या सारंगखेडा येथील घोडे बाजार आणि चेतक उत्सव प्रशासकीय वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्यानंतर चेतक उत्सवासाठी असलेली प्रक्रिया शासने रद्द केली. मात्र, ३०० वर्षांची परंपरा असलेला हा उत्सव लोकसहभागातून साजरा करण्याचा निर्णय स्थानिकांनी घेतला आहे.

घोड्यांचे दृश्य

जिल्ह्यातील सारंगखेडा येथील घोडे बाजाराला शिवकालीन इतिहास आहे. हा घोडे बाजार देशातील सर्वात मोठा घोडेबाजार म्हणून ओळखला जातो. त्यामुळे गेल्या ३ वर्षापासून या ठिकाणी होणारा चेतक उत्सव जागतिक दर्ज्यावर घेऊन जाण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाने पुढाकर घेतला. त्यानुसार पर्यटन विभागाने 'ललुजी आणि सन्स' या कंपनीसोबत करार केला होता. मात्र, हा करार वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर सरकारने चेतक उत्सवाला काही दिवस बाकी असतानाच रद्द केले. त्यामुळे, चेतक उत्सवावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. मात्र, आयोजकांनी या वर्षी लोकसहभागातून चेतक उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असून नेहमीप्रमाणे उत्सवामध्ये पार पडणाऱ्या सर्व स्पर्धांचे आयोजन होणार आहे. त्यामुळे, अश्वप्रेमींसाठी पर्वणी असणाऱ्या या उत्सवात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावावी, असे आवाहन आयोजकांनी केल आहे.

हेही वाचा-नंदुरबारमध्ये बनावट मद्याचा कारखाना उद्ध्वस्त; ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details