नंदुरबार - कोरोना लॉकडाऊनच्या काळात पोलिसांवर ताण पडत असून याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्यावतीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. त्यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या संकल्पनेतून बंदोबस्तावर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी 'सॅनिटायझर व्हॅन' तयार करण्यात आली. बंदोबस्तावर असलेल्या कर्मचाऱयांचे सॅनिटायझेशन व्हावे यासाठी ही 'सॅनिटायझर व्हॅन' बनवण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस दलाच्यावतीने बनवण्यात आली 'सॅनिटायझर व्हॅन' - Sanitizer van
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्यावतीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. त्यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या संकल्पनेतून बंदोबस्तावर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी 'सॅनिटायझर व्हॅन' तयार करण्यात आली.
कोरोनामुळे लावण्यात आलेल्या संचारबंदीत पोलीस दिवस-रात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, आरोग्याची काळजी घेणे देखील तेवढेच गरजेचे असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांसाठी सॅनिटायझर व्हॅन बनवण्याची कल्पना सत्यात आणली.
ही व्हॅन नाकाबंदी असेल किंवा पोलीस आपले कार्य बजावत असतील त्या ठिकाणी नेऊन उभी करण्यात येईल. त्या ठिकाणी असणाऱया कर्मचाऱ्यांना यामध्ये सॅनिटाई़झ करता येईल. नंदुरबार पोलीस दलाच्यावतीने कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेतली जात असल्याने कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढत आहे.