नंदुरबार - राज्याचे मुख्यमंत्री हे भाग्यशाली असून त्यांना शेतीतील अधिक समजते. कुणी अमली पदार्थ बाळगले तर त्यासाठी शिवसेनेला न्यायालयात जाते याचा मी निषेध न करता स्वागत करतो. भविष्यात राज्यात शिवसेनेला अमली पदार्थांचा पेरा करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेला उपरोधात्मक टोला लगावला आहे. राष्ट्रवादीचा एका जातीच्या मतांवर डोळा असल्याने ते आर्यन खानची पाठराखण करत असून ज्या पद्धतीने शरद पवारांनी नवाब मलिकांच्या जावयाची पाठराखण केली. त्यावरुन हे गांजाडी सरकार असून गांजा फुकून हे कारभार करत असल्याची टीका त्यांनी राज्य सरकारवर केली. सदाभाऊ खोत येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
राजु शेट्टी यांचे नाव न घेता टोला-
विधानमंडळ पंचायती राज समितीच्या समिती दौऱ्यानिमित्त नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असणाऱ्या भाजपा आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्याच्या महाआघाडी सरकारवर टिकेची झोड उडवली आहे. राज्याच्या महाआघाडी शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप करत शासनाने दहा हजार कोटींचे जाहीर केलेल पॅकेज फसवे असल्याचा आरोप सदाभाऊंनी केला. यातील साडे तीनशे कोटीच शेतकऱ्यांपर्यंत पोहचणार असून एफआरपी प्रमाणे ऊसदर देत नसलेल्या साखर कारखान्यांवर त्वरीत कारवाईची मागणी त्यांनी केली. तर एका बाजुला सरकारमधून बाहेर पडायचे नाही आणि दुसऱ्या बाजुला शेतकऱ्यांचा पुळका असल्याचे दाखवायचे ही मगरीच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचे प्रकार काही संघटना करत असल्याचे राजु शेट्टी यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.
हे ही वाचा -Mumbai Cruise Drugs Case: यातील ९० टक्के प्रकरणे ही फेक सिद्ध होतील, मोदींनी याची माहिती घ्यावी- नवाब मलिक
दसरा मेळावावरून मुख्यमंत्र्यांवर टीका -
तर शिवसेनेच्या दसऱ्याच्या मेळाव्यातील भाषणावरुन टीका करत शिवसेनेची आर्यन खानबाबतच्या भुमिकेवर देखील खोतांनी विखारी आरोप केले आहेत. शिवसेना जर कोणा अमली पदार्थ बाळगणाऱ्यांसाठी न्यायालयात जात असले तर याच मी टीका न करता स्वागत करतो, राज्यात शिवसेनेला अमली पदार्थांचा पेरा वाढवून शेतकऱ्यांना सधन करायचे असल्यानेच ते आर्यन खानची बाजू घेत असल्याचे खोतांनी सांगितले.