नंदुरबार - राज्य सरकारने ग्रामीण भागातील जनतेला घरपोच मोफत धान्य पुरवण्याची हमी दिली होती. नंदुरबार जिल्ह्यात अजूनही मोफत धान्याचे वितरण सुरू झाले नसल्याने अनेक कुटुंबांत समोर प्रश्न उभा राहिला आहे. संचारबंदीत ग्रामीण भागातील अनेक मजुरांचे रोजगार गेले असल्यामुळे अनेकांना आपल्या कुटुंबाचा गाडा हाकण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
ग्रामीण भागातील जनतेला घरपोच मोफत धान्याची अपेक्षा - स्वस्त धान्य वाटप नंदुरबार
ग्रामीण भागात सरकारकडून रेशन वितरण करण्यात येत असते. मात्र, संचारबंदीमुळे अडथळा निर्माण झाला होता. त्यानंतर सरकारने मोफत धान्य वितरणाचा आदेश काढला. मात्र, तो अजूनही कागदावरच असल्याने नागरिकांना मोफत धान्य मिळत नसल्याचे चित्र आहे.
ग्रामीण भागात सरकारकडून रेशन वितरण करण्यात येत असते. मात्र, संचारबंदीमुळे अडथळा निर्माण झाला होता. त्यानंतर सरकारने मोफत धान्य वितरणाचा आदेश काढला. मात्र, तो अजूनही कागदावरच असल्याने नागरिकांना मोफत धान्य मिळत नसल्याचे चित्र आहे. रोजगार नसल्याने धान्य कुठून खरेदी करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात मोफत धान्य मिळत नसल्याने नागरिकांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सरकारची योजना चांगली असली तरी गरिबांना लवकरात लवकर धान्य द्यावे ही अपेक्षा काही महिलांनी व्यक्त केली आहे.