महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबारच्या औरंगपूरमध्ये धाडसी चोरी; दोन लाखांच्या दागिन्यांसह रोकड लंपास - शहाद्यात चोरी

शहादा तालुक्यातील औरंगपूर येथील रहिवाशी नामदेव गोविंदा पाटील यांच्या घराच्या गच्छीवरील दार उघडून पाठीमागच्या दरवाजाचे कुलूप तोडत चोरट्यांनी आत प्रवेश करत सुमारे 2 लाखाचा मुद्देमाल चोरुन नेला.

nandurbar
शहादा

By

Published : Dec 4, 2019, 10:47 AM IST

नंदुरबार- शहादा तालुक्यातील औरंगपूर गावात धाडसी चोरी करून सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल लांबविण्यात आला आहे. भरवस्तीत चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या चोरीप्रकरणी अज्ञातांविरुध्द शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शहादा तालुक्यातील औरंगपूर येथील रहिवाशी नामदेव गोविंदा पाटील यांच्या घराच्या गच्छीवरील दार उघडून पाठीमागच्या दरवाजाचे कुलूप तोडत चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेल्या 48 हजार रुपयांच्या रोकडसह 1 लाख 44 हजारांचे सोन्या-चांदीच्या दागिने असा सुमारे 2 लाखाचा मुद्देमाल चोरुन नेला. नामदेव गोविंदा पाटील यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलीस ठाण्यात भादंवि कलम 454, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक करीत आहेत. दरम्यान, शहादा परिसरात चोरीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यातच भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला असून चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details