नंदुरबार- महाराष्ट्र गुजरात सीमेवरुन नवापूर तालुक्यातील गुजरातमध्ये जाणाऱ्या आहवा डांग रस्त्यावर भगदाड पडल्याने रस्ता बंद झाला आहे. यामुळे प्रवाशांची तारांबळ होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता तत्काळ दुरुस्त करून स्थानिक प्रवासी व पर्यटक यांच्यासाठी तयार करून द्यावा, अशी मागणी होत आहे.
नंदुरबार येथुन गुजरातमध्ये जाणाऱ्या आहवा डांग रस्त्यावर पडले भगदाड
महाराष्ट्र गुजरात सीमेवरुन नवापूर तालुक्यातील गुजरातमध्ये जाणारा आहवा डांग रस्त्यावर भगदाड पडल्याने बंद झाला आहे. यामुळे प्रवाशांची तारांबळ होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता तत्काळ दुरुस्त करून स्थानिक प्रवासी व पर्यटक यांच्यासाठी तयार करून द्यावा,अशी मागणी होत आहे.
नवापूर तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला असून सर्वत्र मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यात नदी-नाल्यांना महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. नवापूर तालुक्यात प्रशासनाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जोरदार पावसामुळे नवापूरहून गुजरात राज्यातील आहवा डांग जिल्ह्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे भगदाड पडल्याने नवापूर-आहवा रस्ता बंद झाला आहे. हा एकेरी मार्ग असल्याने हा महामार्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद केला आहे. पावसाळ्यातील श्रावण महिन्यात अनेक पर्यटक महाराष्ट्रातून गुजरात राज्यात असलेल्या गिरीमाळ धबधबा, महल, शबरीधाम व सापुतारा या सारख्या गुजरात राज्यातील पर्यटन स्थळावर याच राजमार्गाने प्रवास करतात. परंतु, नवापूर-आहवा रस्त्यावर या एकेरी मार्गावर रस्त्याला भगदाड पडल्यामुळे हा मार्ग बंद झाल्याने पर्यटकांमध्ये मोठी नाराजी आहे. तसेच या परिसरात गावातील लोकांचा यामुळे प्रवासी वाहतुकीचा संपर्क तुटला आहे.