महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्ह्यातील भात कापणी व झोडणीच्या कामास वेग - भात कापणी

नंदुरबार जिल्ह्यात भाताची उत्पादकता 17.26 क्किंटल हेक्टर इतकी असून सध्या भात कापणी व झोडणीच्या कामास वेग आला आहे.

nandurbar
भात कापणी व झोडणीच्या कामास वेग

By

Published : Dec 1, 2019, 1:39 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यात साधारण 18 हजार हेक्टर क्षेत्रावर भाताचे पीक घेतले जाते. त्यापैकी 10 हजार हेक्टर रोपांची लावणीव्दारे लागवड होते. प्रामुख्याने जिल्ह्यात नवापूर व अक्कलकुवा तालुक्यात रोपे लावून भाताची लागवड करण्याचे प्रमाण जास्त आहे.

भात कापणी व झोडणीच्या कामास वेग

जिल्ह्यातील प्रमुख पिकांपैकी भात हे मुख्य पीक असून ते आता कापणीवर आले आहे. भाताची कापणी करून गवत व भात दोन दिवस गुंडाळून वाळवत ठेवून लगेच भात झोडणी करून भात तयार करण्यात येतो.

हेही वाचा - नंदुरबार : जि.प. निवडणुकीकडे राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे दुर्लक्ष, कार्यकर्ते संभ्रमात

आदिवासी शेतकऱ्यांना पारंपरिक व सुंगधित तांदळाचे आकर्षण आहे. त्यामुळे इंद्रायणी, कमद, खुशबू, सेकंड बासमती, आदी वाणाच्या भाताची पेरणी केली जाते. इंद्रायणी, कमद, भाताचे पारंपरिक वाण सुंगधित असल्याने त्याची बाजारपेठेत मोठी मागणी आहे. नंदुरबार जिल्ह्यात भाताची उत्पादकता 17.26 क्किंटल हेक्टर इतकी असून सध्या भात कापणी व झोडणीच्या कामास वेग आला आहे. भाताची कापणी करून गवत व भात २ दिवस गुंडाळून वाळवत ठेवून लगेच भात झोडणी केल्याने मनुष्यबळ कमी लागते. त्यामुळे सध्या सर्वत्र भात काढणीसाठी आदिवासी शेतकऱ्यांची लगबग सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हेही वाचा - नंदुरबारमध्ये एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला

ABOUT THE AUTHOR

...view details