नंदुरबार -येथे गेल्या १० वर्षांपासून तांदूळ महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. मात्र, यावर्षी जिल्हा प्रशासनाने या महोत्सा पाठ फिरवल्याने येथील नागरिक व शेतकऱ्यांमध्ये सध्या नाराजी असल्याचे चित्र आहे.
'तांदूळ महोत्सवा'च्या नियोजनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आदिवासी शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा, त्याकरता बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात यावी. यासाठी नंदुरबार शहरात कृषी विभाग आणि जिल्हाप्रशासन यांच्या वतीने ३ दिवसीय तांदूळ महोत्सव गेल्या १० वर्षपासून भरवला जात होता. मात्र, यावर्षी जिल्हा प्रशासनाने तांदूळ महोत्सवाकडे पाठ फिरवली त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
हेही वाचा -राजवीर व कल्याणी ठरले सारंखेड्याच्या घोडे बाजारातील वैशिष्ट
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी मोठ्या प्रमाणात तांदुळाचे उत्पन्न घेत असतात. त्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि ग्राहकाला चांगला सेंद्रिय तांदूळ मिळावा यासाठी या मोहत्सवाचे आयोजन केले जाते. महोत्सवाच्या या ३ दिवसात सेंद्रिय शेती मालाच्या विक्रीतून जवळपास २५ लाखांची उलाढाल होत असते. ग्राहकांसोबतच आदिवासी शेतकऱ्यांनाही या महोत्सवाची प्रतीक्षा लागून आहे. मात्र, यावर्षी जिल्हा प्रशासनाकडून तांदुळ महेत्सवाच्या नियोजनाच्या कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तर, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालावे अशी मागणीही केली जात आहे.
हेही वाचा - सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधी यांचा नंदुरबारमध्ये निषेध