नंदुरबार - नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे 23 रुग्ण आढळून आले आहेत. यात नंदुरबार शहरातील 21, नवापूर 1, शहादा 1 असे एकूण 23 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 247 झाली आहे. शुक्रवारी आलेल्या 23 पॉझिटिव्ह अहवालांमध्ये महसूल विभागाच्या एका उच्च पदस्थ अधिकार्याचाही समावेश आहे. जिल्ह्याची वाटचाल सध्या रेडझोनकडे सुरू झाली आहे.
गेल्या सप्ताहापासून जिल्हाभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. दोन टप्प्यात आलेल्या अहवालामध्ये 23 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात सर्वाधिक नंदुरबार शहरात 21, नवापूर व शहाद्यात प्रत्येकी 1 असे 23 रुग्ण आढळून आले आहेत.
नंदुरबार शहरातील 42 वर्षिय महिला, 4 वर्षिय बालक, 27 वर्षिय पुरुष, 40 पुरुष, 33 वर्षीय पुरुष, सरस्वती नगरातील 46 वर्षीय पुरुष, मंजुळा विहार कोकणी हिल परिसरातील 42 वर्षिय पुरुष, देसाईपुरा नंदुरबार-30 वर्षीय पुरुष,13 वर्षिय बालक, पायल नगरातील 44 वर्षिय पुरुष, चौधरी गल्लीतील 80 व 50 वर्षीय पुरुष तसेच 40 व 76 वर्षीय महिला, परदेशीपुरा येथील 41 व 26 वर्षीय पुरुष, गांधीनगरातील 25 वर्षीय तीन पुरुष, रायसिंगपुर्यातील 60 वर्षीय पुरुष, कल्याणी पार्क येथील 33 वर्षीय पुरुष तर शहादा येथील गरीब नवाझ कॉलनीतील 72 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह म्हणून आढळला आहे.
तसेच नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील 38 वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या 81 अहवालांपैकी 23 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर कल्याणी पार्कमधील 33 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळून आला. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 247 वर पोहोचली आहे. दरम्यान, कालच्या अहवालात महसूल विभागातील एका उच्च पदस्थ अधिकार्यालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जळगाव, धुळे जिल्ह्याच्या तुलनेत नंदुरबार जिल्हा कोरोना रुग्णांच्या बाबतीत सुरक्षित असताना अचानक महिन्याभरापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात एकूण 2 हजार 299 व्यक्तीचे स्वॅब तपासणीसाठी घेतलेले असून जवळपास 1 हजार 957 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 247 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 10 व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच 148 व्यक्ती संसर्गमुक्त झालेले आहेत सध्या नंदुरबार जिल्हा रुग्णालयात 61 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत तर 247 व्यक्तीवर जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. नाशिक येथे 2 व्यक्ती उपचार घेत आहेत. पुणे येथे 3 व्यक्ती उपचार घेत आहे. बडोदा येथे एका व्यक्तीवर उपचार सुरू आहेत.