नंदुरबार -बंडखोरी करणाऱ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी मागे न घेतल्यास त्यांची हकालपट्टी करण्यात येणार असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांचा दौरा गिरीश महाजन करत आहेत. या दौऱ्यादरम्यान नंदुरबार येथे त्यांनी पक्षाच्या उमेदवारांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
'पक्षातील पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी मागे न घेतल्यास त्यांची हकालपट्टी'
पक्षातील पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी मागे न घेतल्यास त्यांची हकालपट्टी करण्यात येणार असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील बंडखोरांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. येणाऱ्या दोन दिवसांमध्ये बहुतांश बंडखोरी ही क्षमविण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा -'आरे'तील वृक्षतोड बेकायदेशीर नाही का? बॉलिवूडकरांनी व्यक्त केला संताप
त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील बंडखोरांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. येणाऱ्या दोन दिवसांमध्ये बहुतांश बंडखोरी ही क्षमविण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. नंदुरबार येथे त्यांनी पक्षाच्या उमेदवारांची भेट घेतली. यावेळी मात्र डॉ. विजयकुमार गावित यांचे कुटुंब महाजन यांच्या बैठकीपासून अंतर असल्याचेच दिसून आले. दरम्यान, महाजन पक्ष कार्यालयातून निघाल्यानंतर खासदार डॉ. हिना गावित आणि डॉ. विजयकुमार गावित तिथे पोहचले. त्यामुळे, महाजन आणि गावित कुटुंबीयांची भेट भाजप कार्यालयात होऊ शकली नाही.