नंदूरबार - येथील जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच नगरपालिकेच्या पोट निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर दंगा विरोधी पथक (रॅपिड ऍक्शन फोर्स) जिल्ह्यात दाखल झाली आहे. दंगा विरोधी पथकाच्या जवानांनी नंदूरबार शहरात पथसंचलन करून शक्तिप्रदर्शन केले. त्याच्यासोबत दंगा काबूचे प्रात्यक्षिकही दाखविले.
नंदुरबारमध्ये अतिसंवेदनशील भागात दंगा विरोधी पथकाचे पथसंचलन - नंदुरबारमध्ये अतिसंवेदनशील भागात दंगा विरोधी पथकाचे पथसंचलन बातमी
नंदूरबार जिल्हा संवेदनशील आहे. त्यामुळे जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दंगा विरोधी पथकाचे जवान दाखल झाले आहेत. यात 55 कर्मचारी, तीन अधिकारी यांचा समावेश आहे.
अतिसंवेदनशील भागात दंगा विरोधी पथकाचे पथसंचलन
हेही वाचा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सहपरिवार शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
नंदूरबार जिल्हा संवेदनशील आहे. त्यामुळे जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर दंगा विरोधी पथकाचे जवान दाखल झाले आहेत. यात 55 कर्मचारी, तीन अधिकारी यांचा समावेश आहे. त्यांनी शहरातून संचलन करून विविध प्रात्यक्षिके करून दाखविले. तसेच जिल्ह्यातील संवेदनशील भागाची पाहणी करून संवेदनशील भागांची माहिती घेतली.