नंदुरबार- शहादा शहर परिसरात शुक्रवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर समाधानकारक पाऊस आल्याने शेतकरी सुखावला आहे. मात्र, शहादा आगारात पावसाचे पाणी शिरल्याने प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
शहाद्यात मुसळधार पावसाची हजेरी; बस आगारात पाणी साचल्याने प्रवासी त्रस्त - passengers facing problem
खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर समाधानकारक पाऊस आल्याने शेतकरी सुखावला आहे. मात्र, शहादा आगारात पावसाचे पाणी शिरल्याने प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे एसटी महामंडळ प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शहादा आगारामध्ये पावसाचे पाणी साचल्याने शाळकरी मुले आणि प्रवाशांना एसटी गाठण्यासाठी कसरत करावी लागत आहे. तसेच शहादा शासकीय विश्रामगृहातही पावसाचे पाणी साचल्याने विश्रामगृह आवाराला तलावाचे स्वरूप आले आहे. संबंधित प्रशासनाने या समस्येवर योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र, या पावसामुळे परिसरातील शेती कामांना वेग येणार आहे.