महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये पावसाचा जोर कमी, महामार्गावरील वाहतूक पूर्ववत - नद्यांना अजूनही पूरस्थिती कायम

झालेल्या पावसाने जिल्ह्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो झाली होती. या धरणांतील पाण्याचा विसर्ग अजून सुरु आहे. त्यामुळे, नद्यांना अजूनही पूरस्थिती कायम आहे.

rain slowed down in nandurbar transport on highway back on track

By

Published : Aug 5, 2019, 10:07 AM IST

नंदुरबार - जिल्ह्यात शनिवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर आता कमी झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तसेच, रंगावली नदीला आलेल्या पुरामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा बंद करण्यात आला होता. रात्री उशीरा या महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू करण्यात आली.

नंदुरबारमध्ये पावसाचा जोर कमी, महामार्गावरील वाहतूक सुरू

गेल्या आठवडाभरात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो झाली होती. या धरणांतील पाण्याचा विसर्ग अजून सुरू आहे. त्यामुळे, नद्यांची पूरस्थिती अजूनही कायम आहे. यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details