महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये दारू दुकानांची उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणी, तीन दुकानांवर कारवाई - nandurbar lockdown

बियरबार व वाईन शॉप मागच्या दरवाजाने सुरू असल्याचा संशय राज्य उत्पादन शुल्क विभागाला आला. त्यामुळे सील करतांना घेतलेला स्टॉक आणि आता दुकानांमध्ये उपलब्ध असलेला स्टॉक अशी तपासणी जिल्ह्यात सुरू केली आहे.

raid-on-wine-shops-in-nandurbar
नंदुरबारमध्ये दारू दुकानांची उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणी, तीन दुकानांवर कारवाई

By

Published : May 3, 2020, 11:32 AM IST

नंदुरबार- जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून बियर बार व वाईन शॉप सील करण्यात आल्या होत्या. मात्र, काही बियरबार व वाईन शॉप मागच्या दरवाजाने सुरू असल्याचा संशय राज्य उत्पादन शुल्क विभागाला आला. त्यामुळे सील करतांना घेतलेला स्टॉक आणि आता दुकानांमध्ये उपलब्ध असलेला स्टॉक अशी तपासणी जिल्ह्यात सुरू केली आहे. यात काही ठिकाणी स्टॉकमध्ये तफावत आढळून आल्यामुळे सदर परवाना धारकांवर कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यातील बियरबार व वाइन शॉप बंद असून देखील जिल्ह्यात सर्रासपणे दारूची विक्री होत आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागा तर्फे जिल्ह्यातील वाईन शॉप आणि बियरबार यांची तपासणी करण्यात येत आहे. जळगाव धुळे आणि नंदुरबार येथील वाईन शॉपमधील शिल्लक साठा आणि विक्री झालेल्या साठ्यांची तपासणी करण्यात येत आहे. यात तफावत आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

नंदुरबारमध्ये दारू दुकानांची उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणी, तीन दुकानांवर कारवाई

नंदुरबार जिल्ह्यातल्या सर्वच वाईन शॉप आणि बियरबार तपासणीसाठी जिल्ह्यातील संयुक्त पथक दाखल झाले आहेत. नंदुरबार शहरात जिल्हा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या नेतृत्वाखाली ही तपासणी करण्यात येत आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील नवापूर येथील दोन व शहरातील एका वाईन शॉपमध्ये तफावत आढळल्याने त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आल्याची माहिती राज्याचे उत्पन्न विभागातर्फे देण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details