नंदुरबार -तळोदा तालुक्यातील बोरद शिवारात जुगार अड्ड्यावर छापा टाकून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या माजी समाज कल्याण सभापतीसह 10 जणांविरुध्द तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोद्यात जुगार अड्ड्यावर छापा; जिल्हा परिषदेच्या माजी सभापतीसह 10 जणांविरुध्द गुन्हा - तळोदा पोलीस
तळोद्याचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांना बोरद शिवारात एका शेताजवळ जुगार अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. चव्हाण यांनी पायी जात जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या माजी समाज कल्याण सभापतीसह 10 जणांविरुध्द तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोद्याचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांना बोरद शिवारात एका शेताजवळ जुगार अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. चव्हाण यांनी पायी जात जुगार अड्ड्यावर छापा टाकला. कारवाईत रोख रकमेसह मोबाईल आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. पोलीस कॉन्स्टेबल गणेश नथ्थु सोनवणे यांच्या तक्रारीवरून माजी सभापती नरहर बळीराम ठाकरेसह, मोहन दिवल्या मोरे, नथ्थु येलजी पाडवी, कांतीलाल रमेश भिल, विनोद इंदास पाटील, नवल सुरपत पाडवी, अशोक महादू पाटील, कैलास भाईदास पाडवी, रमेश नवल ठाकरे (सर्व रा. बोरद ता. तळोदा), जयसिंग गुलाब ठाकरे (रा. न्युबन ता. तळोदा) या दहा जणांविरुध्द तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपूर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये, म्हणून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. शासन आदेशाचे उल्लंघन करुन हा जुगारअड्डा सुरू होता. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अक्कलकुवा उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, पीएसआय ज्ञानेश्वर पाकळे, पीएसआय अभय मोरे, पीएसआय प्रशांत राठोड, एएसआय राजू वानखेडे, पोलीस कॉन्स्टेबल विकास पवार, प्रकाश चौधरी, राजेंद्र साबळे, कमलसिंग जाधव, रवींद्र कोराळे, दिनकर गुले, विलास पाटील, दिनेश वसावे, अनिल पाडवी, कांतीलाल वळवी यांनी केली.