राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची जनसुनावणी संपन्न;76 तक्रारीवर तत्काळ निर्णय - नंदुरबार
आई-वडील नसलेल्या मुलांच्या तक्रारी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आणि जिल्हाधिकारी,अधिकारी यांच्या बैठकीत जनसुनावणी घेण्यात आली.

नंदुरबार- येथील राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची जनसुनावणी संपन्न झाली आहे. आई-वडील नसलेल्या मुलांच्या तक्रारी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आणि जिल्हाधिकारी, अधिकारी यांच्या बैठकीत जनसुनावणी घेण्यात आली. या बैठकीत धुळे आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यातून एकूण 99 तक्रारी होत्या. त्यापैकी 76 तक्रारीवर तत्काळ निर्णय देण्यात आले. नंदुरबार हा आदिवासी जिल्हा असल्याने याठिकाणी मुलांच्या शिक्षण आरोग्य या बाबींवर विशेष लक्ष देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी दिली.