नंदुरबार- शहरातील जामा मस्जिद परिसरात 5 हजार मुस्लीम बांधवांनी एकत्र येत सूर्यग्रहण काळात सामूहिक नमाज पठण करून जिल्ह्यात व राज्य देशात शांतता राहावी, अशी प्रार्थना केली.
सूर्य ग्रहणावेळी नमाज पठण करत मुस्लीम बांधवांची शांततेसाठी प्रार्थना - नमाज पठण
आज (दि. 26) सूर्य ग्रहणावेळी म्हणजे सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत तब्बल 5 हजार मुस्लीम समाजबांधवांनी एकत्र येत नमाज पठण केले. त्यानंतर देशात व जिल्ह्यात शांतता रहावी यासाठी प्रार्थना केली.
समाजात सूर्यग्रहणाविषयी असलेल्या गैरसमज दूर करण्यासाठी मुस्लीम समाजातील शिक्षित युवकांनी हा उपक्रम हाती घेतला होता. शहरातील मच्छीमार्केट परिसरातील जामा मस्जिदीत मौलाना व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज (दि. 26 डिसें) दिसणार्या सूर्यग्रहणानिमित्त जामा मस्जिद शहरातील मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामूहिक नमाज पठण केले. नमाज पठणानंतर देशात व जिल्ह्यात शांतता रहावी, अशी प्रार्थना केली. सकाळी 8 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत ही प्रार्थना सुरू होती. प्रार्थना संपल्यानंतर मौलाना यांनी प्रवचन केले. देशात व जिल्ह्यात शांतता रहावी यासाठी आव्हान देखील केले.
हेही वाचा - नंदुरबार : सारंगखेडा यात्रोत्सवात देशभरातील अश्व व्यापाऱ्यांच्या सहभाग