महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये जिल्हा पोलीस दलातर्फे पत्रकारांसाठी पीपीई किटचे सूट

पत्रकार मोठी जोखीम घेऊन माहिती जनसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवतात. त्याचसोबत जनजागृतीचे मोठे काम करत असतात. मात्र, अनेक डॉक्टर्स, पोलीस आणि पत्रकारांना कोरोना विषाणूंची लागण होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आणि काही सामाजिक संघटनांच्यावतीने शहरातील इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि छायाचित्रकार यांना पीपीई सूट देण्यात आले.

By

Published : Apr 22, 2020, 5:54 PM IST

Updated : Apr 22, 2020, 7:39 PM IST

नंदुरबारमध्ये जिल्हा पोलीस दलातर्फे पत्रकारांसाठी पीपीई कीटचे सूट
नंदुरबारमध्ये जिल्हा पोलीस दलातर्फे पत्रकारांसाठी पीपीई कीटचे सूट

नंदुरबार - कोरोना विषाणूची लागण पत्रकारांनाही होत असल्याचे समोर आले आहे. यात इलेक्ट्रीकल मीडिया आणि छायाचित्रकार यांची संख्या जास्त आहे. म्हणून पत्रकारांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले आहे.

नंदुरबारमध्ये जिल्हा पोलीस दलातर्फे पत्रकारांसाठी पीपीई किटचे सूट

पत्रकार मोठी जोखीम घेऊन माहिती जनसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचवतात. त्याचसोबत जनजागृतीचे मोठे काम करत असतात. मात्र, अनेक डॉक्टर्स, पोलीस आणि पत्रकारांना कोरोना विषाणूंची लागण होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आणि काही सामाजिक संघटनांच्यावतीने शहरातील इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि छायाचित्रकार यांना पीपीई सूट देण्यात आले. कोरोना संसर्गापासून पत्रकारांचे संरक्षण व्हावे, यासाठी पोलीस दलातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला.

हेही वाचा -कोरोनाशी लढा; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी राबते डॉक्टरचे कुटुंब, बनवतात 'फेस शिल्ड'

जिल्हा पोलीस दल आणि पुजारा बंधु यांच्या वतीने हे कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित, अप्प्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी उपस्थित होते. नंदुरबार जिल्हा पोलीस दल राज्यातील पहिले दल आहे की ज्यांनी पत्रकारांच्या संरक्षणासाठी पापीई सूट दिले.

Last Updated : Apr 22, 2020, 7:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details