महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धडगाव उपविभागात साडेतीन हजार ग्राहकांचे वीज कनेक्शन कापले - महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ बातमी

याअंतर्गत आतापर्यंत 3 हजार 400 ग्राहकांचे वीज कनेक्शन कापले गेले आहे. विज वितरण कंपनीकडून थकबाकीदार ग्राहकांना वारंवार सूचना करुनही त्यांच्याकडून वीज बिलांचा भरणा झाला नाही. अखेर गेल्या आठवड्यापासून वीज कनेक्शन कापण्याची कारवाई सुरु करण्यात आली होती. याअंतर्गत आतापर्यंत 3 हजार 400 ग्राहकांचे वीज कनेक्शन कापले गेले आहे.

धडगाव उपविभागात 3 हजारांच्या वर ग्राहकांचे वीज कनेक्शन कापले

By

Published : Sep 19, 2019, 5:26 PM IST

नंदुरबार -थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी विज वितरण कंपनी कठोर पावले उचलत आहे. याअंर्गतच शहादा विभागातील धडगाव उपविभागात 3 हजारांच्या वर ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्यात आले आहे. यामुळे, धडगाव शहरासह दुर्गम भागातील अनेक घरे गेल्या आठ दिवसांपासून अंधारात आहेत.

धडगाव उपविभागात 3 हजारांच्या वर ग्राहकांचे वीज कनेक्शन कापले

धडगाव उपविभागातील घरगुती आणि व्यावसायिक वीज बिलांची वसुली गत सहा महिन्यांपासून झालेली नसल्याची माहिती आहे. विज वितरण कंपनीकडून थकबाकीदार ग्राहकांना वारंवार सूचना करुनही त्यांच्याकडून वीज बिलांचा भरणा झाला नाही. अखेर गेल्या आठवड्यापासून वीज कनेक्शन कापण्याची कारवाई सुरु करण्यात आली होती. याअंतर्गत आतापर्यंत 3 हजार 400 ग्राहकांचे वीज कनेक्शन कापले गेले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details