नंदुरबार - आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर अश्लील चित्रफीत व्हायरल केल्याप्रकरणी एका अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनावधानाने हा प्रकार घडल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
शासकीय व्हॉटस्ॲप ग्रुपवर अश्लिल चित्रफित व्हायरल अश्लील चित्रफित व्हायरल
नंदुरबार येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या शासकीय कामकाजासाठी व्हाट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत सहा महिला व ४७ पुरुषअसेएकूण ५३ सदस्य त्यात आहेत.या व्हाट्सअॅप ग्रुपवर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील सहाय्यक नियोजन अधिकारीपदावर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने २६ तारखेला रात्री ११ वाजून ११ मिनिटांनी एक पावणेदोन मिनिटांची अश्लील चित्रफीत व्हायरल केली. हा प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी ग्रुपमधील सदस्यांच्या लक्षात आला. याप्रकारामुळे ग्रुपमधील महिला सदस्यांचा अवमान झाला. या घटनेची गंभीर दखल घेऊन कार्यालयीन अधीक्षक वसावे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गुन्हा दाखल
तक्रारीनुसार संशयित राहुल इदे यांच्याविरोधात भादंवि कलम ३५४, ५०९, ६७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास अटक केल्यानंतर एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. अनावधानाने सदरचा प्रकार घडल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.