नंदुरबार - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासन नागरिकांना मास्क घाला, सॅनिटायझर लावा फिजिकल डिस्टन्स पाळा अशा सूचना करत आहे. याबात जनजागृतीही करण्यात आलेली आहे. मात्र, तरीही काही नागरिक घराबाहेर विनामास्क पडत आहेत. अशा नागरिकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
विनामास्क फिरणाऱ्यांवर नंदुबारमध्ये कारवाई; 41 जणांवर गुन्हे दाखल - मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी असताना विनामास्क असणार्या 41 जणांवर जिल्ह्याभरात कारवाई करण्यात आली आहे. यात विनामास्क फिरणारे दुचाकीस्वार व दुकानदार यांचा समावेश असून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहरात अनेक ठिकाणी दुचाकीस्वार विनामास्क, डबल-ट्रिपल सीट वाहने चालवताना दिसत आहेत. अशा लोकांची वाहन जप्त करून दंडात्मक कारवाई शहर पोलिसांनी सुरू केली आहे. त्यामुळे आता नागरिकांना जास्तीत जास्त शिस्त लावून, नियमांचे काटेकोरपणे पालन करून कोरोनावर मात करण्यासाठी कठोर पावले प्रशासनातर्फे उचलण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.