महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबार; पोलिसांकडून अफूचे पीक नष्ट करण्यास सुरुवात; मुख्य संशयित फरार - नंदुरबार लेटेस्ट क्राईम न्यूज

गेल्या काही दिवसांपूर्वीच नंदुरबार तालुक्यातील अक्राळे येथे अफूची शेती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी नष्ट केली होती. यातून सुमारे पाचशे किलोच्या वर अफूची झाडे पोलिसांनी जप्त करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली होती.

अफूची कापणी
अफूची कापणी

By

Published : Mar 9, 2021, 3:12 PM IST

Updated : Mar 9, 2021, 3:59 PM IST

नंदुरबार- शहादा तालुक्यातील म्हसावद महसुल मंडळातील शिरुड गावशिवारात पोलीसांनी धाड टाकून साडेसात एकर अफूची शेती उध्दवस्त केल्याची कारवाई केली. याप्रकरणी ३६ तास उलटल्यानंतरही मुख्य संशयितांच्या शोध लागलेला नाही. तसेच रात्रभर याप्रकरणासंदर्भात परिसरात पोलिसांकडून या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे. तहसीलदारांच्या समक्ष अफूच्या शेतीचे मोजमाप करण्यात येऊन सुमारे ५० मजूरांच्या मदतीने अफूच्या पिकीची कापणी केली जात आहे. त्यानंतर नेमका किती किलो अफू आहे हे स्पष्ट होईल, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांनी दिली.

पोलिसांकडून अफूचे पीक नष्ट करण्यास सुरुवात

दोन्ही शेतातील अफू पीक कापणीला सुरुवात
शहादा तालुक्यातील शिरुड शिवारातील शेतात अफूची शेती होत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांना मिळाली. त्यांनी पथकासह धाड टाकून कारवाई सुरू केली आहे. तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत परिसरातील पन्नास मजुरांच्या सहकार्याने दोन्ही शेतातील अफूच्या पीक कापणीला सुरुवात झाली असून दोन दिवसांत ही कारवाई पूर्ण होणार आहे. त्यानंतर या शेतातून नेमका किती किलो अफूचे उत्पादन झाले, हे स्पष्ट होईल. याप्रकरणी दोन्ही शेतमालकांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे. अफूची शेती करण्यामागे अंतरराज्यीय टोळी असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुख्य सूत्रधाराचा अद्याप शोध लागलेला नाही.

तालुक्यात पहिल्यांदा सर्वात मोठी कारवाई
तालुक्यातील पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात शेतातून अफूचे उत्पादन घेतले जात असल्याने परिसरातील शेतातून असा प्रकार घडला आहे का? यासंदर्भात पोलीसांनी चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याप्रकरणाचा पारदर्शीपणे तपास करण्यात येईल. अफू शेती करण्यामागे मास्टर माईंड कोण? याचा लवकरच शोध घेऊन कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आठवड्यात दुसरी अफूची शेती नष्ट
गेल्या काही दिवसांपूर्वीच नंदुरबार तालुक्यातील अक्राळे येथे अफूची शेती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी नष्ट केली होती. यातून सुमारे पाचशे किलोच्या वर अफूची झाडे पोलिसांनी जप्त करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली होती. जिल्ह्यात अजून कुठे अफूची शेती केली जात आहे का? त्याच बरोबर अफूची शेती करण्यामागे नेमका उद्देश काय? याचा शोध प्रशासनाला घेणे गरजेचे आहे.

Last Updated : Mar 9, 2021, 3:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details