महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदूरबार येथे गांजा पकडला; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई - nandurbar weed news

बंधारपाडा येथील एका घरात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकून अडीच किलो गांजा जप्त केला.

police-seized-cannabis-from-various-places-in-nandurbar
नंदूरबार येथे गांजा पकडला; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

By

Published : Nov 29, 2020, 7:15 PM IST

नंदूरबार -नवापूर तालुक्यातील बंधारपाडा येथील एका घरात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकून अडीच किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून रोहिदास शांत्या गावित (रा. बंधारपाडा ता. नवापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

नवापूर तालुक्यातील बंधारपाडा येथील एका घरात सुका गांजा विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बंधारपाडा गाव शिवारात असलेल्या एका शेतातील घरात छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी 12 हजार 700 रुपये किंमतीचा अडीच किलो सुका गांजा जप्त केला. याप्रकरणी रोहिदास गावित या अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 1 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

शहादा तालुक्यातही पकडला गांजा -

दरम्यान, शहादा तालुक्यातील मंदाना येथे दोघांकडून सव्वा लाखाचा गांजा जप्त करण्याता आला आहे. शहादा तालुक्यातील मंदाणा ते वडगाव मार्गावर दुचाकीने गांजाची वाहतूक करताना नंदूरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोघांना पकडले असून त्याच्याकडून 1 लाख 26 हजार रुपये किंमतीचा 18 किलो सुका गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. मगन गिरधर पावरा व बन्सीलाल उर्फ बन्टी राजसिंग पावरा, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. नंदुरबार जिल्ह्यात एकाच दिवशी गांजा पकडल्याची ही दुसरी कारवाई करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details