नंदुरबार - शहादा शहरातील दोंडाईचा रस्त्यालगत असलेल्या एका हॉटेलमागील परिसरातील इमारतीत जुगाराचा अड्डा सुरू होता. याचवेळी भरपावसात दोन पोलीस उपाधिक्षकांनी साध्या गणवेशात जुगार अड्ड्यावर छापा मारला. त्यांच्या पाठोपाठ अन्य पोलीस अधिकारी देखील दाखल झाले. या कारवाईत पोलिसांनी 43 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 13 लाखांची रोकड व 65 लाखांच्या गाड्या असा एकूण 78 लाख 16 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
शहाद्यातील दोंडाई रस्त्यालगत एका इमारतीत जुगाराचा अड्डा सुरू होता. या अड्ड्यात मध्यप्रदेश व गुजरात राज्यातील जुगारी जुगार खेळण्यासाठी येत असल्याची माहिती शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांना मिळाली. त्यांनी त्या माहितीची खातरजमा करून इमारतीत छापा मारण्याचे नियोजन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम व उपअधिक्षक सुनिल साळुंखे हे दोघे भर पावसात दुचाकीने इमारतीच्या ठिकाणी पोहोचले. साध्या वेशात इमारतीत प्रवेश केलेल्या दोन्ही पोलीस अधिकार्यांना कोणीही ओळखले नाही. प्रत्येक जुगारी जुगाराच्या डावाची बाजी लावण्यात व्यग्र होता.
अवघ्या काही मिनिटांनी या दोन्ही अधिकार्यांच्या पाठोपाठ पोलीस अधिकार्यांचे पथक दाखल झाले. पोलिसांचा छापा पडताच जुगार्यांची धावपळ उडाली. या कारवाईत 13 लाख 1 हजार रुपयांची रोकड तसेच इमारतीबाहेरील महागड्या गाड्या (65 लाख रुपये) दुचाकी, चारचाकी गाड्या आणि 45 मोबाइल असा एकूण 78 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तसेच आठ मोटरसारकली देखील जप्त केल्या आहेत.
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल भगवान रामदास सावळे यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 43 जुगार्यांवर जुगार प्रतिबंधक कारदा अधिनिरम कलम 4, 5 सह भादंवि कलम 188, 268, 269, 290 सह आपत्ती व्यवस्थापन कलम 51 (ब) सह साथरोग प्रतिबंधक अधिनिरम कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्रात आला आहे. तपास परिविक्षाधीन उपअधीक्षक सुनील साळुंखे व उपनिरीक्षक भगवान कोळी करत आहेत. ही कारवाई उपविभागीर पोलीस अधिकारी विक्रांत कदम, पोलीस उपअधिक्षक सुनील साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे, रवींद्र सपकाळे, गणेश साबळे आणि अन्य अधिकाऱ्यांच्या पथकाने केली.