नंदुरबार- नवापूर तालुक्यातील गडद सागीपाडा गावाच्या जंगलात गुजरात-महाराष्ट्र सीमावर्ती भागात रात्रीच्या सुमारास नवापूर पोलिसांनी दोन ठिकाणी छापे टाकले. यात पोलिसांकडून १८ लाखांचा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे दारु तस्करीची आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
नवापूर पोलिसांकडून छापा टाकून १८ लाखांचा दारुसाठा जप्त - gujrat
नवापूर शहरात पोलिसांनी मोठी कारवाई केल्याने दारू तस्कारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मध्य प्रदेश राज्यातून दारु तस्करी करणारे किशोर पाटील, रवि गिरासे यांना नंदुरबार शहरातून अटक करण्यात आली आहे. तर सागीपाडा व गडद येथील जागा मालक ईलियास रतिलाल गावित, रा. सागीपाडा आणि शिवाजी सेगजी गावित रा. गडद यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दोन्ही संशयित आरोपी फरार असून नवापूर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
नवापूर शहरात पोलिसांनी मोठी कारवाई केल्याने दारू तस्कारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू तस्करी चालत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी करता तरी काय, असा सवाल या कारवाई दरम्यान उपस्थित केला जात आहे. या कारवाईत पोलिसांनी सागीपाडातून विदेशी दारू आय.बीचे १०३ बॉक्स आणि गडद येथून १६२ बॉक्स असे एकूण १८ लाखांचा माल हस्तगत केला आहे.