महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संचारबंदीतही लॉजमध्ये आढळले जोडपे, पोलिसांनी छापा मारुन लॉज संचालकावर केला गुन्हा दाखल

कोरोनामुळे देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र संचारबंदीचे नियम धाब्यावर बसवून लॉजमालकाने लॉज सुरू ठेवली होती.

Shree
पोलिसांनी छापा मारलेली लॉज

By

Published : Apr 17, 2020, 10:06 AM IST

नंदुरबार- कोरोना संसर्ग टाळण्यासाठी देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र संचारबंदीतही काही ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू असल्याचे उघड होत आहे. पोलिसांनी लॉजवर टाकलेल्या छाप्यात एक जोडपे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना नवापूर शहरातील श्रीजी गेस्ट हाउस येथे उघडकीस आली. त्यामुळे पोलिसांनी संचालक नानकचंद हिरालाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व व्यवहार बंद ठेवून संचारबंदी लागू आहे. असे असताना नवापूर शहरातील श्रीजी गेस्ट हाऊस हे सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक नासीर पठाण यांच्या पथकाला मिळाली. या पथकाने सायंकाळी छापा टाकला असता, लॉजमधील एका रुममधून एक महिला व पुरूष मिळून आले. या दोघांची लॉजच्या रजिस्टरमध्ये कुठल्याही प्रकारची नोंद नव्हती. त्यामुळे पोलिसांनी दोघांना विचारपूस केली. याप्रकरणी श्रीजी गेस्ट हाऊसचे संचालक नानकचंद हिरालाल अग्रवाल (रा.आदर्श नगर नवापूर) यांच्याविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details