नंदुरबार - जिल्ह्यातील नवापूर शहराजवळ एका शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व नवापूर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सहा जणांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.
नवापुरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, चारचाकी वाहनांसह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त - जुगार अड्डा नवापूर
देशभरात लॉकडाऊन सुरू असताना नवापूर-पिंपळनेर रस्त्यावरील पिंपळनेर चौफुलीजवळ असलेल्या एका शेतात जुगार अड्डा सुरू होता. ही माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वषेण शाखेचे पोलीस निरिक्षक किशोर नवले, नवापूर पोलीस निरिक्षक विजयसिंग राजपूत यांनी संयुक्त कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला.
देशभरात लॉकडाऊन सुरू असताना नवापूर-पिंपळनेर रस्त्यावरील पिंपळनेर चौफुलीजवळ असलेल्या एका शेतात जुगार अड्डा सुरू होता. ही माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वषेण शाखेचे पोलीस निरिक्षक किशोर नवले, नवापूर पोलीस निरिक्षक विजयसिंग राजपूत यांनी संयुक्त कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्याठिकाणाहून 57 हजार रुपयांची रोकड व वेगवेगळ्या कंपनीची चार चाकी वाहने जप्त करण्यात आली आहे. तसेच सुमित परशुराम अग्रवाल, मोहन जगदिश दर्जी, रविंद्र हिरालाल चव्हाण, लक्ष्मण दत्तु पाटील, अमर गोविंद सोनार, आकाश शंकर दर्जी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वषेण शाखेचे पोलीस निरिक्षक किशोर नवले, नवापूर पोलीस निरिक्षक विजयसिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरिक्षक धिरज महाजन, रितेश इंदवे, प्रविण मोरे, जयेश बाविस्कर, अदिनाथ गोसावी, योगेश साळवे, महेंद्र नगराळे, दादाभाई वाघ, शांतिलाल पाटील यांनी केली.