महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीनंतर जि.प. सदस्याला पोलिसांनी केली अटक - nandurbar

जिल्हा परिषद सदस्य कपिल चौधरी फरार होते. कपिल चौधरी जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मतदान करायला जिल्हा परिषदेच्या सभागृहात आले होते. निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर अक्कलकुवा पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी नाट्यमयरित्या त्यांना अटक केली आहे.

nandurbar
कपिल चौधरी अटक

By

Published : Jan 18, 2020, 12:17 PM IST

नंदुरबार- जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक संपन्न झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आवारात एक थरार नाट्य घडले. अक्कलकुवा येथील आमश्या पाडवी यांचे संपर्क कार्यालय जाळण्यात आले होते. याबाबत आरोपी असलेल्या भाजपचे जिल्हा परिषद सदस्य कपिल चौधरी यांना पोलिसांनी जिल्हा परिषदेत अटक केली आहे.

कपिल चौधरी यांना अटक होतादरम्यानचे दृश्य

शिवसेना जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी यांचे संपर्क कार्यालय जाळण्यात आले होते. त्या प्रकरणी भाजपचे जिल्हा परिषद सदस्य कपिल चौधरी यांच्या विरोधात अनुसूचित जमाती अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य कपिल चौधरी फरार होते. कपिल चौधरी जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मतदान करायला जिल्हा परिषदेच्या सभागृहात आले होते. निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर अक्कलकुवा पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी नाट्यमयरित्या त्यांना अटक केली आहे.

हेही वाचा-मकरसंक्रांतीला मांजाने जखमी झालेल्या पक्ष्यांवर उपचार; 'बर्ड कॅम्प'चा उपक्रम

ABOUT THE AUTHOR

...view details