महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबार: शहादा घरफोडीतील अल्पवयीन मुलगा ताब्यात; एलईडीसह 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त - Minor boy custody in Burglary case

शहादा येथे शासकीय वसाहतीत झालेल्या घरफोडीप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 34 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

police-arrest-a-minor-boy-in-shahada-burglary
शहादा घरफोडीतील अल्पवयीन मुलगा ताब्यात

By

Published : Dec 8, 2019, 3:25 AM IST

नंदुरबार -शहादा येथे शासकीय वसाहतीत झालेल्या घरफोडी फोडीप्रकरणी अल्पवयीन मुलाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून घरफोडीतील 34 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पुढील कारवाईसाठी अल्पवयीन मुलाला शहादा पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.

नंदुरबारच्या शहादा शहरात घरफोडी व चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलीसांसमोर गुन्हे उघडकीस आणण्याचे आव्हान निर्माण झाले होते. शहादा येथील वीज वितरण कंपनीच्या शासकीय वसाहतीत कर्मचारी दयाराम अनंत भामरे यांच्याकडे चोरी होऊन एलईडी टीव्हीसह 87 हजाराचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. याप्रकरणी शहादा पोलीसांत अज्ञाताविरुद्ध कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी वेगवेगळी पथक तयार करुन जिल्ह्याभरात सक्रीय केली होती. सराईत गुन्हेगारांवर पाळत ठेवण्यात आली होती.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शहादा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता दोघे संशयित तरुण या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसुन आले. दोघा संशयितांपैकी एकाला यापूर्वीच घरफोडीच्या दोन गुन्ह्यांमध्ये अटक केली असल्याचे किशोर नवले यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ आपल्या पथकाला शहादा येथे पाठवत संशयितांचा शोध घेण्यास सांगितले. संशयित आरोपीच्या घरी व परिसरात शोध घेतला असता तो मिळून आला नाही.

घरफोडीतील संशयित शहादा शहरातील अमरधाम येथे असल्याची गुप्त बातमी पथकाला मिळाल्यानंतर अमरधामच्या चौफेर तपास पथकाने सापळा रचून संशयित अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता त्याच्या घराजवळ राहणाऱ्या एका साथीदाराच्या मदतीने वीज वितरण कंपनीच्या शासकीय वसाहतीत चोरी केल्याचे त्याने सांगितले. चोरीतील एलईडी टीव्ही व दागिने असा एकुण 34 हजाराचा मुद्देमाल त्याने पोलीसांच्या ताब्यात दिला. पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किशोर नवले, पोलीस शिपाई दिपक गोरे, प्रदीपसिंग राजपूत, मोहन ढमढेरे, सतिष घुले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ABOUT THE AUTHOR

...view details