नंदुरबार - नवापूर तालुक्यातील गुजरात राज्याच्या सीमावर्ती भामरमाळ येथे अहवा फाट्याजवळ असलेल्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतातील कच्च्या शेडमध्ये झन्ना-मन्ना नावाच्या जुगारावर पैसे लावून खेळत होते. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये 3 मालक व 7 संशयित आरोपी पकडण्यात आले आहेत. याबरोबरच १० मोटरसायकल आणि 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नवापूरमध्ये जुगार अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई, 10 मोटरसायकलसह 2 लाखांचा मुद्देमाल ताब्यात - नवापूर जुगार अड्डे नंदुरबार
नवापुर तालुक्यातील गुजरात राज्याच्या सीमावर्ती भामरमाळ येथे अहवा फाट्याजवळ असलेल्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतातील कच्च्या शेडमध्ये झन्ना-मन्ना नावाच्या जुगारावर पैसे लावून खेळत होते. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये 3 मालक व 7 संशयित आरोपी पकडण्यात आले आहेत. याबरोबरच १० मोटरसायकल आणि 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा -धुळे-सोलापूर रस्ता चौपदरीकरणाच्या भूसंपादनात 3 हजार कोटींचा घोटाळा - विजय वडेट्टीवार
मात्र, दुसरीकडे तालुक्यातील लक्कडकोट गावातील आंतरराज्य जुगाराचा अड्डा बंद करण्यास जिल्हा पोलीस प्रशासनाला यश आले नाही. अजूनही येथील मोठे मातब्बर जुगारकिंग मोकाट आहेत. वरिष्ठांची टीम कारवाई करण्यास गेली तरी स्थानिक कर्मचारी बातमी लिंक करून जुगाऱयांना पळवून लावतात. यासाठी स्वत: जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी भेट द्यावी आणि परिस्थिती पाहणी करून कायम स्वरूपी अवैध धंदे बंद करावे. अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.