महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आंबेडकरांनी आदिवासींना दिलेले आरक्षण कधीच रद्द होऊ देणार नाही - पंतप्रधान मोदी - पंतप्रधान मोदी

पाच एकर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनासुद्धा पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन यावेळी पंतप्रधानांनी दिले.

पंतप्रधान मोदी

By

Published : Apr 22, 2019, 6:15 PM IST

नंदुरबार- लोकसभा मतदारसंघातील युतीच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आज नंदुरबारमध्ये पार पडली. यावेळी पंतप्रधानांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासींना दिलेले आरक्षण कधीच रद्द होऊ देणार नसल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी नंदुरबारकरांना दिले.

त्याचबरोबर सत्तेत भाजप सरकार आल्यानंतर आदिवासी शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणून तसेच पाच एकर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनासुद्धा पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन यावेळी पंतप्रधानांनी दिले. या सभेला नागरिकांनी भर उन्हातही हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली होती.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे उमेदवार के. सी. पाडवी विरुद्ध युतीच्या उमेदवार हिना गावित अशी लढत रंगणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details