महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तळोदा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले; सात मजूर जखमी - नंदुरबार अपघात

तळोदा येथे भरधाव वेगाने चाललेले पिकअप वाहन उलटल्याने 7 मजूर जखमी झाले आहेत. पिकअप धडगाव येथून येत असताना कोठार आश्रमशाळेजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने उलटले. जखमींवर तळोदा येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले असून 2 गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

pickup accident at Taloda Seven laborers were injured
तळोदा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप उलटला

By

Published : Nov 29, 2019, 10:40 AM IST

नंदुरबार -तळोदा येथे भरधाव वेगाने चाललेले पिकअप वाहन उलटल्याने 7 मजूर जखमी झाले आहेत. पिकअप धडगाव येथून येत असताना कोठार आश्रमशाळेजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने उलटले. जखमींवर तळोदा येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले असून 2 गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तळोदा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप उलटला; सात मजूर जखमी

हेही वाचा - परभणी एटीएसने दुचाकी चोरांचा केला पर्दाफाश; १४ गाड्या जप्त

धडगाव तालुक्यातील मजूर पिकअपने (वाहन क्र. एमएच 39 डब्लु 0241) जात असताना चालकाचे पिकअपवरील नियंत्रण सुटले व अपघात झाला. या अपघातात 7 मजूर जखमी झाले आहेत. हिर्‍या सुग्या वसावे, पिंट्या दादल्या वळवी, दारक्या गुजर्‍या वळवी, बोटी जुन्या पाडवी, आशा जुन्या पाडवी, मेहंदी हिरा वसावे, कविता सेंदा वळवी यांचा जखमींमध्ये समावेश आहे. जखमींपैकी हिर्‍या वसावे व पिंट्या वळवी या दोघांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर उर्वरित पाच जखमींवर तळोदा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

ABOUT THE AUTHOR

...view details