महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबारमधील पेट्रोल पंप बंद; अत्यावश्यक सेवेसाठी होणार पुरवठा

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले असून फक्त जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी नागरिकांना घराबाहेर पडण्याची सवलत देण्यात आली आहे. या सवलतीचा गैरफारदा घेऊन नागरिक अनावश्यकरित्या दुचाकी आणि इतर वाहनांमधून फिरत आहेत. त्यामुळे नंदुरबारमधील पेट्रोल पंप बंद करण्यात आले आहेत.

Petrol Pumps close
पेट्रोल पंप बंद

By

Published : Apr 1, 2020, 11:11 AM IST

नंदुरबार - शहादा, नवापूर, तळोदा , धडगाव, नंदुरबार नगरपालिका आणि अक्कलकुवा ग्रामपंचायत हद्दीतील पेट्रोल पंप बंद केले आहेत. पंपावरून पेट्रोल आणि डिझेलचे वितरण 31 मार्चच्या मध्यरात्रीपासून बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. त्यामुळे पेट्रोलपंप बंद राहणार असून केवळ अत्त्यावश्यक सेवेच्या वाहनांना इंधनाचा पुरवठा सुरू राहणार आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले असून फक्त जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी नागरिकांना घराबाहेर पडण्याची सवलत देण्यात आली आहे. या सवलतीचा गैरफारदा घेऊन नागरिक अनावश्यकरित्या दुचाकी आणि इतर वाहनांमधून फिरत आहेत. त्यामुळे प्रतिबंधक उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर प्रतिकूल परिणाम होण्याची आणि कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील नगरपालिका आणि ग्रामपंचायत हद्दीतील पेट्रोलपंप बंद करण्यात आले आहेत.

पेट्रोलपंपधारकांनी केवळ शासकीय वाहने आणि अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांनाच पेट्रोल व डिझेल उपलब्ध करून द्यावे. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांसाठी परवानगीचे पासेस नगरपालिका मुख्याधिकारी आणि ग्रामसेवकांनी द्यावेत. नागरिकांनी किराणा, दूध, भाजीपाला आणि औषधे आदी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी देखील वाहनांचा वापर करू नये. शक्य झाल्यास जवळच्या ठिकाणावरून वस्तू खरेदी कराव्यात. जीवनावश्यक वस्तू जवळच उपलब्ध होण्यासाठी तालुका प्रशासनामार्फत वॉर्डनिहाय आणि कॉलनीनिहाय नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details