नंदुरबार- कोरोना विरुद्धच्या युद्धात योगदान देणाऱ्या योद्ध्यांमुळे शहादा शहर कोरोनामुक्त झाले. त्यामुळे या योद्ध्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी शहादा शहरातील संकल्प ग्रुपने पोलीस, महसूल आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर पुष्पवृष्टी केली. यावेळी आरोग्य तसेच महसूल कर्मचारी व पोलीस प्रशासनाचा गौरव करण्यात आला.
कौतुकास्पद; शहादा शहर कोरोनामुक्त करणाऱ्या योद्ध्यांवर नागरिकांनी उधळली 'फुले'
शहादा शहरात कोरोना रुग्णांची संख्या दहावर गेली होती. मात्र स्थानिक आरोग्य यंत्रणा, महसूल यंत्रणा आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी या काळात आपला जीव धोक्यात घालून कोरोनाची साखळी ब्रेक केली होती. या कोरोना योद्ध्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी शहाद्यातील संकल्प ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी या योद्ध्यांवर पुष्पवृष्टी करत त्यांचा सत्कार केला.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात कोरोना रुग्णांची संख्या दहावर गेली होती. मात्र स्थानिक आरोग्य यंत्रणा, महसूल यंत्रणा आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी या काळात आपला जीव धोक्यात घालून कोरोनाची साखळी ब्रेक केली. त्यानंतर शहादा शहर कोरोनामुक्त झाले आहे. या कोरोना योद्ध्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी शहाद्यातील संकल्प ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी योग्य अंतर ठेवत या योद्ध्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांचा सत्कार केला. त्यासोबत नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये, तसेच पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन या ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने केलेल्या सूचनांचे योग्य ते पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महसूल अधिकाऱ्यांनीकेले. याचबरोबर संकल्प ग्रुपच्या प्रतिनिधींनी प्रशासनाने व आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे योग्य पालन करावे, तसेच नियमांचे उल्लंघन करू नये, म्हणून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी संकल्प ग्रुपकडून करण्यात आले.