नंदुरबार - नवापूर शहरातील रंगावली नदीकिनारी भाजीपाला बाजार भरवण्यात आला. येथे नागरिक 'सोशल डिस्टन्स' न ठेवता भाजीपाला विक्री व खरेदी करताना दिसून आले. नंदुरबार जिल्हाधिकार्यांनी आठवडी बाजार बंद करण्याचे निर्देश दिले आहे. परंतु, अत्यावश्यक सेवा म्हणून याच ठिकाणी भाजीपाला बाजार भरवण्यात आलेला आहे. भाजीपाला विक्रेते, खरेदी करणार्यांपैकी काहींनी मास्क घातलेले नाहीत. इतकी मोठी गर्दी ही कोविड- 19 आजाराच्या आमंत्रण देऊ शकते.
नियमांची ऐशी-तैशी! लॉकडाऊनमध्ये नवापूरात भरला ‘आठवडी बाजार’
अत्यावश्यक सेवा म्हणून याच ठिकाणी भाजीपाला बाजार भरवण्यात आलेला आहे. भाजीपाला विक्रेते, खरेदी करणार्यांपैकी काहींनी मास्क घातलेले नाहीत. इतकी मोठी गर्दी ही कोविड- 19 आजाराच्या आमंत्रण देऊ शकते.
नंदुरबार
देशात राज्यात कोरोनाची आकडेवारी तीन हजारच्या पुढे गेल्याने चिंताजनक स्थिती आहे. तरीही नागरिक भाजीपाला बाजारात गर्दी करताना दिसून आले. पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, नगरपालिका प्रशासनाने वारंवार सूचना देऊन देखील नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, असे चित्र आहे. या बेपर्वाईमुळे कोरोनाचा धोका वाढण्याची भीती आहे.
Last Updated : Apr 5, 2020, 3:42 PM IST