नंदुरबार- वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे सातपुड्याच्या दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था सलाईनवर आहे. धडगाव ग्रामीण रुग्णालयात रिक्त पदांमुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे रुग्णांना सेवा देण्यासाठी 24 तास डॉक्टर नियुक्त करण्याची मागणी होत आहे.
धडगाव ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदांमुळे रुग्णांची हेळसांड - आरोग्य सेवा
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे सातपुड्याच्या दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था सलाईनवर आहे. धडगाव ग्रामीण रुग्णालयात रिक्त पदांमुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे रुग्णांना सेवा देण्यासाठी 24 तास डॉक्टर नियुक्त करण्याची मागणी होत आहे.
धडगाव ग्रामीण रुग्णालयात आसपासच्या 150 गावांहुन आणि पाडय़ांवरुन किमान 500 रुग्ण दैनंदिन तपासणीसाठी येतात. यात त्यांच्यातील काहींचा आजार मोठा असल्यास त्यांना दाखल करुन घ्यावे लागते. या रुग्णांना दिवसरात्र सेवा देण्यासाठी येथे 24 तास डॉक्टर नियुक्त करण्याची मागणी आहे. सध्या वातावरण बदलामुळे किरकोळ आजारांसह सर्पदंश, अपघात किंवा इतर गंभीर स्वरुपातील आजारी व्यक्तींना याठिकाणी दररोज दाखल करण्यात येत आहे. यामुळे रुग्णालयाला यात्रेचे स्वरुप आहे. पूर्ण क्षमतेने कर्मचारी नसल्याने सेवा देण्यात अडथळे येत आहेत. विशेष म्हणजे येत्या काळात धडगाव येथे महिला रुग्णालय व नवजात अर्भक केंद्रही सुरु होणार आहे. तेथेही रिक्त पदांची स्थिती कायम राहिल्यास संपूर्ण आरोग्य सेवा हे केवळ स्वप्न ठरणार आहे.