नंदुरबार - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पपई पिकाची लागवड केली जाते. मात्र, या वर्षी झालेली अतिवृष्टी आणि पपई पिकावर आलेल्या ‘डावणी’ रोगामुळे पपई उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात मोठ्या मेहनतीने पपईच्या बागा जगवल्या. मात्र, आता पपई पिकाला फळधारणा होत असून या कालावधीत पिकावर ‘डावणी’ नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. यामुळे पपईची पिकाची फुलगळ होत आहे. दरम्यान, यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटणार असून आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागान मार्गदर्शन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.