महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट; दीड हजार परप्रांतीय मजूर, विद्यार्थी श्रमिक एक्स्प्रेसने गावाकडे रवाना - जामिरा संकुल नंदुरबार

नंदुरबार येथील 26, तळोदा 7, नवापूर 18, शहादा 12 तसेच साक्री येथील 7 अशा 70 मजुरांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थी व मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दुपारी 1 वाजेच्या सुमारास रेल्वे नंदुरबार स्थानकात दाखल झाली. प्रवाशांसह ही रेल्वे विद्यार्थी व मजुरांना घेवून गुवाहाटीच्या दिशेने 2 वाजून 40 मिनिटांनी रवाना झाली.

spl
श्रमीक एक्स्प्रेसने रवाना होताना नागरिक

By

Published : May 29, 2020, 12:19 PM IST

नंदुरबार- लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या श्रमीक एक्स्प्रेसने त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आले. जामिरा संकुल येथील 1518 विद्यार्थी तसेच जिल्ह्यातील अन्य 70 मजूर अशा 1588 प्रवाशांना विशेष श्रमीक एक्स्प्रेसने झारखंड, बंगाल व आसामला पाठविण्यात आले.

यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पांडा, अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील, उपजिल्हाधिकारी कैलास कडलग, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, रेल्वेचे सहायक परीचालन प्रबंधक गुलाबसिंग गहलोत, जामिया संकुलाचे अध्यक्ष मौलाना गुलाम वस्तानवी, प्रिन्सिपल रफीक जहागिरदार, मौलाना जावेद पटेल आदी उपस्थित होते.

कोरोना इफेक्ट; दीड हजार परप्रांतीय मजूर, विद्यार्थी श्रमीक एक्स्प्रेसने गावाकडे रवाना

रेल्वेने प्रवास करणाऱ्या मजुरांमध्ये नंदुरबार येथील 26, तळोदा 7, नवापूर 18, शहादा 12 तसेच साक्री येथील 7 अशा 70 मजुरांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थी व मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दुपारी 1 वाजेच्या सुमारास रेल्वे नंदुरबार स्थानकात दाखल झाली. प्रवाशांसह ही रेल्वे विद्यार्थी व मजुरांना घेवून गुवाहाटीच्या दिशेने 2 वाजून 40 मिनिटांनी रवाना झाली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नागरिकांना व विद्यार्थ्यांना बसमधून उतरवून सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत सर्वांना रेल्वेत बसविण्यात आले. जामियामार्फत सर्व प्रवाशांना पिण्याचे पाणी, भोजन सामुग्री आणि मास्क उपलब्ध करून देण्यात आले. आपल्या मूळ गावी जात असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर अत्यंत आनंद दिसत होता. यावेळी पालकमंत्री अ‍ॅड. के. सी. पाडवी तसेच शासन व प्रशासनाचे विद्यार्थी व मजुरांनी विशेष आभार मानले.

ABOUT THE AUTHOR

...view details