महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबारमधील गोमाई नदीच्या पाण्यात एक जण गेला वाहून - Pingana Shahada Road In Nandurbar

नंदुरबारमध्ये पिंगाणा-शहादा जोडणाऱ्या पुलाच्या जवळून जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात एक तरुण वाहून गेला.

वाहून गेलेला तरुण

By

Published : Aug 4, 2019, 11:58 PM IST

नंदुरबार -शहादा शहरातील गोमाई नदीच्या पुलावरुन एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. अंबालाल साहेबया भिल (18, शिवाजीनगर), असे या तरुणाचे नाव आहे. अद्यापपर्यंत त्याचा शोध लागलेला नाही.

जिल्ह्यात मागील २४ तासांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नद्या, तलाव, विहिरी आणि ओढे यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अशाच एका घटनेत पिंगाणा-शहादा जोडणाऱ्या पुलाच्या जवळून जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात अंबालाल वाहून गेला. प्रशासनाकडून त्याचा शोध घेतला जात असून यासाठी शोधकार्य सुरू आहे.

जिल्ह्यात पावसाचा हाहाकार-

आज तोरणमाळ घाटात ५ ठिकाणी दरडी कोसळल्या, तर खर्डी नदीला पूर आणि रंगावली नदीला महापूर आला आहे. दुसरीकडे नवापूर तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ बंद करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details