नंदुरबार- अक्कलकुवा शहरात कोरोनाचा एक रूग्ण आढळल्याने तहसीलदार विजयसिंग कच्छवे यांनी भाग क्र. 2 मधील कोंडवाडा गल्ली (पुर्वेकडील भाग) दर्गा रोड (फेमस चौकाजवळील भाग), हवालदार फळी (दक्षिणेकडील भाग) प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. उत्तरेकडील अनिस अहमद फत्तेमहमद यांच्या घरापासून उत्तरेकडील दर्गारोड परिसर, पश्चिमेकडील कोंडवाडा गल्लीतील पारस अशोकचंद सोलंकी यांच्या घरापासून, दक्षिणेकडून फेमस चौक, पुर्वेकडील इंदिरानगर परिसर अशा प्रतिबंधात्मक क्षेत्राच्या चतु:सिमा असतील.
अक्कलकुवा शहरात आढळला कोरोना बाधित रुग्ण, तहसीलदारांनी केला परिसर 'सील' - नंदूरबार लॉकडाऊन
प्रतिबंधात्मक क्षेत्रात कोणालाही ये-जा करता येणार नाही. सर्व प्रकारच्या वाहनांना या क्षेत्रात प्रतिबंध असेल. अत्यावश्यक सेवा सुरळीत राहण्यास मुभा राहील. अशी सेवा पुरविणार्यांची तपासणी करणे बंधनकारक राहील. अत्यावश्यक सेवेसाठी संबंधितांना सुरक्षा पास उपलब्ध करून देण्यात येतील.
![अक्कलकुवा शहरात आढळला कोरोना बाधित रुग्ण, तहसीलदारांनी केला परिसर 'सील' one person tested corona positive in akkalkuva nandurbar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6918067-279-6918067-1587702559175.jpg)
या परिसराच्या उत्तरेकडील दर्गारोड परिसर, केशव नगर, बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यासोबत पश्चिमेकडील कोंडवाडा गल्ली, दक्षिणेकडील फेमस चौक परिसर, कुंभार गल्ली आणि पुर्वेकडील इंदिरा नगर परिसर हे क्षेत्रदेखील बफर झोन म्हणून जाहीर केले आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्रात कोणालाही ये-जा करता येणार नाही. सर्व प्रकारच्या वाहनांना या क्षेत्रात प्रतिबंध असेल. अत्यावश्यक सेवा सुरळीत राहण्यास मुभा राहील. अशी सेवा पुरविणार्यांची तपासणी करणे बंधनकारक राहील. अत्यावश्यक सेवेसाठी संबंधितांना सुरक्षा पास उपलब्ध करुन देण्यात येतील. प्रतिबंधीत क्षेत्रात येण्याजाण्याच्या ठिकाणी उष्म चाचणी करणे आवश्यक राहील. आरोग्य सेवकांनी ये-जा करणार्या सर्वांची छाननी करावी. प्रतिबंधात्मक क्षेत्रातून बाहेर जाणार्या अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींची नोंद घेण्यात येईल. भौगोलीक विलगीकरण क्षेत्रात जाणार्या व्यक्तींना औषधांचा डोस देण्यात येईल. या क्षेत्रातून बाहेर जाणार्या वाहनांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील. अत्यावश्यक सेवेचा पुरवठा करताना सोशल डिस्टन्सिंग करणे आवश्यक राहील. आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.