नंदुरबार - जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील मृत 67 वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत बाधिताच्या 65 वर्षीय पत्नीचा अहवालदेखील कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर, उर्वरित 7 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. लोणखेडा ग्रामपंचायतीच्या वतीने परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून त्याठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. तर, परिसरातील नागरिकांची आरोग्य विभागातर्फे आरोग्य तपासणी केली जात आहे.
नंदुरबार : लोणखेड्यातील 'त्या' कोरोनाबाधित मृताच्या पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह - नंदुरबार कोरोना आकडेवारी
लोणखेडा येथील मृत 67 वर्षीय व्यक्तीचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत बाधिताच्या 65 वर्षीय पत्नीचा अहवालदेखील कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर, उर्वरित 7 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. लोणखेडा ग्रामपंचायतीच्या ते राहत असलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून त्याठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. नागरिकांची आरोग्य तपासणीही केली जात आहे.
मंदाणा येथील 52 वर्षीय महिला व लोणखेडा येथील 67 वर्षीय पुरुष यांच्यात कोरोनासदृश्य लक्षणे आढळल्याने त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते. त्यात मंदाण्यातील 52 वर्षीय महिलेचा 14 जून रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर, लोणखेड्यातील 67 वर्षीय पुरुषाचा त्याच दिवशी मृत्यू झाला, मात्र, त्यांचा अहवाल येणे बाकी होते. प्रशासनाने कुठलीही जोखीम न घेता मृतावर त्याच्या मुलाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केला होता. तर त्याच दिवशी सायंकाळी या 67 वर्षीय मृत व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील पत्नीसह 7 जणांना क्वॉरंटाईन करण्यात येऊन नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल प्राप्त झाले असता लोणखेडा येथील कोरोनाबाधित मृताच्या 65 वर्षीय पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर, उर्वरित संपर्कातील 7 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
यावर प्रशासनाने खबरदारी घेत लोणखेडा येथील बाधित महिलेच्या वास्तव्याचा परिसर कंटेंन्मेंट झोन जाहीर केला आहे. लोणखेडा ग्रामपंचायतीतर्फे निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत असून आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण मोहिम राबविण्यात येत आहे.