महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; धुळे-सूरत महामार्गावरील घटना - दुचाकी अपघात

धुळे-सूरत महामार्गावर भरधाव वेगातील ट्रकच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाल्याची घटना नवापूर येथे घडली.

nandurbar
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

By

Published : Jan 2, 2020, 2:21 PM IST

नंदुरबार -भरधाव वेगातील ट्रकच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर, एकजण जखमी झाल्याची घटना धुळे-सुरत महामार्गावर नवापूर येथे घडली. याप्रकरणी ट्रकचालक योगेश धर्मा गावित (रा.सोनखांब ता. नवापूर) याच्याविरुध्द नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्‍वर ताराचंद खैरनार (वय 32) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून गोकुळ ताराचंद खैरनार (वय 65) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.

बारडोली येथील ज्ञानेश्‍वर खैरनार व गोकुळ खैरनार हे दोघे भाऊ दुचाकीने धुळे-सूरत महामार्गावरून जात होते. दरम्यान, भरधाव वेगातील ट्रकने समोरून दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने ज्ञानेश्‍वरचा जागीच मृत्यू झाला. तर, गोकुळ हे जखमी झाले आहेत. ही घटना नवापूर शहरातील नगरपालिका गार्डनजवळ घडली. या अपघातात दुचाकीचे नुकसान झाले असून सचिन शांतीलाल मिस्त्री यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार ट्रक चालकावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details