महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी महिला आघाडीकडून रस्त्यावर चूल पेटवत आंदोलन - नंदुरबार राष्ट्रवादी बातमी

गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी महिला आघाडीकडून नंदुरबार येथे रस्त्यावर चूल मांडून आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात दोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

आंदोलक
आंदोलक

By

Published : Dec 27, 2020, 5:14 PM IST

Updated : Dec 27, 2020, 10:20 PM IST

नंदुरबार - इंधन दरवाढी निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष हेमलता शितोळे यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार शहरातील मुख्य रस्त्यावर चूल मांडून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. गेल्या वर्षभरापासून सिलिंडरचे दर सतत वाढत असल्याने नंदुरबारमधील धुळे चौफुली येथे रिकामा सिलिंडर ठेवत बाजूला चूल पेटवून रस्त्यावर भाकर टाकत आंदोलन करण्यात आले.

बोलताना महिला जिल्हाध्यक्ष

केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणाबाजीमुळे परिसर दणाणला होता.

राष्ट्रवादी महिलांचा केंद्र सरकारला इशारा

केंद्र सरकारने सिलिंडरचे भाव कमी केले नाही तर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाभर रास्तारोको करण्यात येईल, असा इशारा महिला जिल्हाध्यक्ष हेमलता शितोळे यांनी सांगितला आहे.

हेही वाचा -ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सातवी पासची अट, सुशिक्षित उमेदवार शोधण्यासाठी दमछाक सुरू

हेही वाचा -आंध्रप्रदेशातून विक्रीसाठी आलेला पावणेचार लाखाचा सुका गांजा जप्त; दोघांविरुध्द गुन्हा दाखल

Last Updated : Dec 27, 2020, 10:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details