महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवापूर निवडणूक कार्यालयात आचारसंहितेबाबत उदासीनता - Nawapur Tahsil Office Nandurbar

राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. असे असताना देखील नवापूर तहसील कार्यालय परिसरातील अनेक ठिकाणी विकासकामांच्या फलकावर लोकप्रतिनिधींच्या नावाचा उल्लेख असलेले फलक उघडेच पडले होते.

हीच ती न झाकलेली विकासकामांची फलके

By

Published : Sep 22, 2019, 10:33 AM IST

नंदुरबार- महाराष्ट्र राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०१९ ची घोषणा दुपारी बारा वाजता करण्यात आली. त्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. असे असताना देखील नवापूर तहसील कार्यालय परिसरातील अनेक ठिकाणी विकासकामांच्या फलकावर लोकप्रतिनिधींच्या नावाचा उल्लेख असलेले फलक उघडेच पडले होते.

आचार संहितेची पायमल्ली करताना नवापूर तहसील कार्यालय

इच्छुकांनी लावलेले होर्डिंग मात्र त्वरित काढून घेण्याची दक्षता राजकीय नेत्यांनी घेतली असली, तरी राजकीय कार्यालयांवर झेंडे व बॅनर दिसून आले आहे. नवापूर तहसील कार्यालयातून आचारसंहितेची अंमलबजावणी केली जाते, त्याच कार्यालयात आचारसंहितेचे पालन होत नासल्याचे दिसून आले आहे. यावेळी निवडणुक आयोगाचे जाहिरातीचे बॅनर मात्र फाटलेल्या अवस्थेत दिसून आले. निवडणुक शाखेत कोणताही कर्मचारी दिसून आला नाही.

हेही वाचा-गावातील रस्त्यासाठी गावकरी एकवटले; शहादा पोलीस स्टेशन समोर रास्तारोको

नवापूर प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालयात विकासकामांच्या फलकांकडे अजूनही कुणाचे लक्ष गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यासंदर्भात निवडणुक शाखेतील कर्मचारी यांना विचारले असता शहरात फलक काढण्याचे काम सुरू आहे. कर्मचारी जेवायला गेले असल्याने ते कार्यालयात दिसून आले नाही असे सांगण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details