नंदुरबार- शहादा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
शहाद्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा - कार्यकर्ता मेळावा
नंदुरबारमधील शहादा येथे गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला आहे. यावेळी तालुक्यातील अनेक गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, इतर पक्षातील सदस्य आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
सर्वांनी एकदिलाने काम करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावे
आगामी विधानसभा निवडणुका आणि नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा शहादा येथे घेण्यात आला होता. या मेळाव्याला राज्यस्तरावरील नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यांच्याकडून जिल्ह्यातील पक्षाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी सर्व नेत्यांनी एकदिलाने काम करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेत असे आव्हान कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना करण्यात आले. या मेळाव्यात तालुक्यातील काही गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, इतर पक्षातील कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आघाडी संदर्भात राज्यस्तरावरून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.