महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकारी दालनाबाहेर ठिय्या आंदोलन - नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी अचानकपणे जिल्हाधिकारी दालनाच्या बाहेरील परिसराचा ताबा घेतल्याने प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली.

नंदुरबार

By

Published : Nov 4, 2019, 4:02 PM IST

नंदुरबार- जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी, प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी योजना (आरसीईपी) करार त्वरित रद्द करावा, या मागणीसाठी नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले.

नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

हेही वाचा -मला विश्वास, नवीन सरकार लवकरच स्थापन होईल - देवेंद्र फडणवीस

अचानक नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी दालनाच्या बाहेरील परिसराचा ताबा घेतल्याने प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. यावेळी शेतकरीविरोधी भूमिका घेणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. या आंदोलनात आदिवासी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details