नंदुरबार - मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले. नर्मदा प्रकल्पबाधित लोकांचे अजुनही पुनर्वसन न झाल्याने कार्यकर्त्यांनी आज हा मोर्चा काढला होता.
नर्मदा बचाव आंदोलन कार्यकर्त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार
मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. नर्मदा प्रकल्पबाधित लोकांचे आजही पुनर्वसन न झाल्याने नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

घोषणाबाजी करतांना मोर्चेकरी
घोषणाबाजी करतांना नर्मदा बचाव चे कार्यकर्ते
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चा दाखल होताच पोलिसांनी कार्यालय परिसरात गेट बंद करून हा मोर्चा अडवून धरला. मात्र यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी बळजबरीने गेट उघडून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. त्यानंतर पोलिसांनी मोर्च्याकऱ्यांना अडवण्यासठी जिल्हाधिकारी कार्यलयातील खालच्या प्रवेशद्वारलाही कुलूप लावले होते. त्यामुळे नर्मदा बचावच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.