महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदूरबार जिल्हा परिषदेचा 26 कोटींचा शिल्लकी अर्थसंकल्प मंजूर

सन 2021-22 या वर्षाचा मूळ अर्थसंकल्पीय बचतीच्या खर्चाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी एकूण 38 कोटी 93 लाख 48 हजार 146 रुपयांचा अर्थसंकल्पाचे अंदाजपत्रक सादर झाल्याने सभेत 26 कोटी 4 लाख 80 हजार 743 रूपयांचा शिल्लकी अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.

nandurbar zilla parishad approves balance budget of twenty six crore
नंदूरबार जिल्हा परिषदेचा 26 कोटींचा शिल्लकी अर्थसंकल्प मंजूर

By

Published : Mar 13, 2021, 10:36 AM IST

नंदूरबार- नंदूरबार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सन 2021-22 या वर्षाचा मूळ अर्थसंकल्पीय बचतीच्या खर्चाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी एकूण 38 कोटी 93 लाख 48 हजार 146 रुपयांचा अर्थसंकल्पाचे अंदाजपत्रक सादर झाल्याने सभेत 26 कोटी 4 लाख 80 हजार 743 रूपयांचा शिल्लकी अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.

जिल्हा परिषद अध्यक्षांनी सादर केला अर्थसंकल्प-

नंदूरबार जिल्हा परिषदेच्या मोगी सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा वळवी यांनी सन 2020-21 चा अर्थसंकल्प सादर केला. त्यात नंदूरबार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उत्पन्नाचे जमा व खर्च सन 2020-21 चा सुधारीत अंदाजपत्रक सन 2021-22 समाजकल्याण विभागात अनुशेषासह सुधारित 4 कोटी 70 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. महिला बालकल्याण विभागासाठी 1 कोटी, बालकल्याण व महिला विभागासाठी 52 लाख, दिव्यांग कल्याण विभागासाठी 1.5 कोटी, पाझर तलाव बंधारे दुरुस्तीसाठी 2 कोटी, रस्ते परीक्षणासाठी 8 कोटी, तर प्राथमिक शाळा दुरुस्तीसाठी 60 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अध्यक्षा व सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक -

जिल्हा परिषदेच्या सभागृहात सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा करत असताना 15 वित्त आयोगांतर्गत समान निधी वाटप व्हावा, याकरिता विरोधी पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्या व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमावर्ती यांच्यात शाब्दिक चकमक झाली. तर प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाकरिता प्रभारी डॉ. वनमाला पवार यांची नियुक्ती का करण्यात आली. यावरूनदेखील मोठा वाद निर्माण झाला होता. त्याचबरोबर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

तीन सभापतींच्या अनुपस्थितीत झाली अर्थसंकल्पीय सभा -

सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेल्या नंदूरबार जिल्हा परिषदेच्या 11 सदस्यांचे सदस्यत्त्व रद्द केल्यानंतर जिल्हा परिषदेचे बांधकाम तथा अर्थ सभापती राम रघुवंशी, आरोग्य सभापती जयश्री पाटील, कृषी सभापती अभिजित पाटील यांच्या अनुपस्थितीत अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा घेण्यात आली.

हेही वाचा - महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : कोल्हापुरात बसवर दगडफेक

ABOUT THE AUTHOR

...view details